सद्य हवामान स्थितीत वावरातल्या पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे.  सोयाबीन सह वावरातील इतर खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र पावसाचा अंदाज असल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन तज्ञांच्या मार्फत करण्यात आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीन पिकाची काढणी पुढे ढकलावी.

खरीप ज्वारी : पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले खरीप ज्वारी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. खरीप ज्वारी पिकाच्या कणसांची काढणी पुढे ढकलावी.

बाजरी : बाजरी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजरी पिकाच्या कणसांची काढणी पुढे ढकलावी.

ऊस : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

हळद : पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

See also  बिहार बाहुबली डॉन पूर्व विधायक राजन तिवारी हुआ गिरफ्तार

हरभरा : हरभरा पिकाच्या पेरणीसाठी बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

Leave a Comment