दिलासादायक ! ‘या’ दिवशी थेट खात्यात जमा होणार अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची रक्कम

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र दिलासादायक बाब म्हणजे मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याची नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून यंदाच्या वर्षी मदतीचे निकष देखील बदलले आहेत. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून भरपाईची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहेत. जुलैमध्ये नुकसान होऊन देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक नया पैसा देखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली, शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. अखेद दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.

 

See also  बिलोशिनि अधिकार अधिनियम के तहत जिलाधिकारी ने की 8 मामलों की सुनवाई - Nalanda Darpan - गाँव-जेवार की बात।

Leave a Comment