ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.

या काळात सोशल मीडियावर ट्रेंड

सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी आज (27 ऑक्टोबर) ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे. ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट आज सकाळी 11 ते रात्री 11 या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे, सरकारला या बाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.

काय आहेत नेमक्या मागण्या

–किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भ्रातृभावी संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
–राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी व अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी या मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
— विविध शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

राज्य सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेनं केली आहे. यासाठी उद्या दिवसभर ओला दुष्काळप्रश्नी ऑनलाईन ट्रेंडची मोहिम चालवली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन अजित नवले यांनी केलं आहे.

See also  प्रथम चरण के तेघरा व बरौनी नगर परिषद के नामांकन को लेकर अलग-अलग कई टेबल लगाए गए

 

Leave a Comment