After Amul, Gokul Increased Milk Rates

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना आता दुधाच्या दरामध्ये (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. आधी अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र आता गोकुळने देखील म्हशीच्या दूध विक्री दरात वाढ केली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र समूहाकडून देण्यात आली आहे. गोकुळ ने केलेली ही दुध दरवाढ शुक्रवार पासून लागू करण्यात येणार आहे.

किती रुपयांची वाढ ?

वृत्तानुसार, गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू असेल. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत (Milk Rate) ६६ रुपयांवरून ६९ रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.

याबाबत बोलताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “रशिया-युक्रेन संघर्ष आणि अनेक दूध उत्पादक देशात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटले असून, दूध पावडरची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या दूध संकलन कमी असल्याने पावडरची मागणी पुरवू शकत नाही. दूध संकलन वाढवण्यासाठी खरेदी दरात (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

दोन दिवसांपूर्वी अमूलने केली होती दरवाढ (Milk Rate)

अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे ६१ रुपयांवरून ६३ रुपये होणार आहे. गायीचे दूध आता ५३ रुपये प्रतिलिटरपासून ५५ रुपये प्रतिलिटर होणार आहे. यासह गोल्ड, म्हशीच्या दूध दरातही लीटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गुजरात वगळता देशातील सर्वच राज्यांत लागू असेल.

See also  ओवरब्रिज का निर्माण किया जा रहा है।

Leave a Comment