PM Kisan : 12वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी मोठा बदल, आता फक्त मोबाईल नंबरवरून शेतकरी जाणून घेऊ शकणार स्टेट्स

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही देशातील सर्वात मोठी सरकारी योजना आहे. ज्याच्याशी 12 कोटी शेतकरी थेट जोडले गेले आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवते. जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात ४ महिन्यांत २ हजार रुपये हप्ता म्हणून पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठविण्यात आले असून 12 वा हप्ता वाटपासाठी काऊंट टाउन सुरू झाले आहे. पण, त्याआधी केंद्र सरकारने या योजनेच्या एका नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ज्या अंतर्गत आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना फक्त मोबाईल क्रमांकावरून हप्त्याची स्थिती कळू शकणार आहे. हा मोठा बदल थेट 11 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकर्‍यांना प्रभावित करेल.

पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकर्‍यांना पूर्वी स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांचा आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्यक होता. ज्या अंतर्गत शेतकरी पीएम किसान (PM Kisan) वेबसाइटवर त्यांचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती सहज जाणून घेऊ शकतात. मात्र, नव्या बदलांनंतर आता आधारऐवजी शेतकऱ्यांना हप्त्यासह इतर स्थिती केवळ मोबाईल क्रमांकावरूनच कळणार आहे.

स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?

शेतकऱ्यांसाठी पीएम किसानची (PM Kisan) स्थिती जाणून घेणे का महत्त्वाचे आहे. हा प्रश्न सर्वसामान्य आहे. खरं तर, केंद्र सरकारने पीएम किसान योजना पारदर्शक करण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या अपात्र लोकांना ओळखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या योजनेतून अनेक अपात्रांची नावे काढण्यात आली आहेत. त्याच वेळी, 12 वा हप्ता रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून पीएम किसानची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो.

12वा हप्ता दिवाळीपूर्वी रिलीज होणार!

पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जुलैमध्ये जारी करण्यात आला. यासोबतच 12वा हप्ता जाहीर करण्याची तयारी सुरू झाली होती. ज्यांना अंतिम रूप देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12वा हप्ता जारी करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे. ज्या अंतर्गत 12 व्या हप्त्याचे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील.

See also  12 से 13 घंटा तक कटिहार मेडिकल कॉलेज के चप्पे-चप्पे में सीबीआई के टीम खंगालती रही, साथ ले गए कई महत्वपूर्ण कागजात

 

 

 

 

 

Leave a Comment