कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर




कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर | Hello Krushi











































हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लाऊन बसला असताना सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहिला जातोय का ? असा सवाल निर्मण होता असून सध्याच्या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क पोस्टर लावून सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. हे अनोखे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

संकटांनी घेरलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आपली व्यथा मांडणारं पोस्टर लावलं आहे. “आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा” अशी वाक्ये लिहून पोस्टर च्या माध्यमातून राज्यकर्ते आणी प्रशासनाला जागं करण्यासाठी लक्षवेधी पोस्टर आंदोलन केलं आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो देखील लावले आहेत.

See also  बॉलीवुड फिल्म धूप छांव का पोस्टर रिलीज,जानें कब है रिलीज डेट

दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे हे आपली शेतजमिन मिळवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून लोकशाही व्यवस्थेनुसार प्रशासनाशी लढत आहेत. आपल्याकडं प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, आपल्याला न्याय मिळावा या हेतूने वानखडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीचं आंदोलन केलं आहे. शिवाय दिवाळी सण तोंडावर आला असताना देखील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकराची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रशांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली. शेतकऱ्याची दखल कोणाही घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

error: Content is protected !!





Leave a Comment