Weather Update Today Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान स्थिती ?

अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात (Weather Update) उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या भागाला आज यलो अलर्ट

हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडयातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

See also  तेघरा अनुमंडल में लगा चलंत लोक अदालत, विभिन्न मामलों का हुआ निष्पादन

Leave a Comment