पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे.

त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.याबाबत डाबरे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी व पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य आहे.

माहिती भरताना काय काळजी घ्यावी

१)Standing Crop Harvested व Cut & Spread Bundled For Drying असे पर्याय दिलेले असून, त्यापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा.

२)नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के नमूद करावी.

३)कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calimity) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी.

४)पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडावा.

५)नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी.

६)प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी.

७)तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

८)सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

See also  पुसाचे डिकंपोझर तंत्रज्ञान; पाचटही संपेल आणि खतही तयार होईल

Leave a Comment