शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! वन्य प्राण्यांपासून पिकाची नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार; जाणून घ्या कस ते…

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकरी शेतीमध्ये दिवस-रात्र कष्ट करतात आणि आपले पीक फुलवत असतात मात्र काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे पीक कधीकधी जमीन दोस्त देखील होते. मात्र नैसर्गिक आपत्तीच नाही तर जंगली प्राण्यांमुळे देखील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसत असतो. जंगली जनावर शेतकऱ्याच्या उभ्या पिकाची नसधूस करत असताना दिसतात. मात्र याबाबत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने काही योजना देखील चालू केल्या होत्या. त्यामध्येच प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पंतप्रधान पिक विमा योजने संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

प्राण्यांनी नुकसान केल्यास या ठिकाणाहून करा अर्ज

तुमच्या शेती पिकाचे जर वन्य प्राण्यांनी नुकसान केले तर तुम्हाला नुकसान भरपाईसाठी अर्ज कुठे करायचा हे माहीत नसेल तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करायचे आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सरकारी योजना हा ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पिक विमा फसल योजना संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे पाहू शकतात त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे जर पिकाचे नुकसान झाले तर त्याचाही विम्यामध्ये समावेश करून त्याची नुकसान भरपाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भामध्ये केंद्र सरकारने राज्यांना पीक नुकसानीबाबत अधिसूचित करण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या उभ्या उभे पीक जंगली प्राणी नष्ट करतात. मका असेल ऊस असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल जंगली प्राणी जंगली प्राणी चांगलीच नासाडी करून टाकतात. अशा परिस्थितीत इतर वन्य प्राण्यांमुळे पीक नष्ट झाले तर नुकसानीचा दावा पीक विम्यात केला जाऊ शकतो. त्या दाव्याच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतचा प्रश्न शुक्रवारी राज्यसभेमध्ये विचारण्यात आला असून वन्य प्राण्यांमुळे पिकाच्या नुकसानीच्या भरपाईचा प्रश्न होता त्यावर कृषी मंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

नेमकं काय म्हणाले कृषिमंत्री?

या विषयावर बोलताना संसदेमध्ये कृषिमंत्री म्हणाले की, वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळता येण्याची योग्य श्रेणीत येते त्यामुळे आतापर्यंत पीएम फसल विमा योजनेत याचा समावेश करण्यात आला नव्हता मात्र पीक विम्याचा समावेश करण्यात आला आहे. हे पाहता केंद्र सरकारने देखील राज्यांना हे नुकसान अधिसूचित करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

See also  जिला पदाधिकारी नालन्दा द्वारा कुल 06 वादों को किया गया निष्पादित

Leave a Comment