दुष्काळात तेरावा…! 17 गोणी फ्लॉवर विकून मिळाला फक्त साडेनऊ रुपयांचा भाव – Hello Krushi

हॅलो कृषी ऑनलाईन : आधीच बदलत्या हवामानामुळे शेती करणे आणि त्यातून चांगले उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या शिरूर इथल्या एका शेतकऱ्याने तब्बल १७ गोणी म्हणजेच जवळपास आठशे फ्लॉवर मुंबई इथल्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवला. मात्र त्याला सर्व खर्च वगळवून केवळ साडेनऊ रुपयांची बिलाची पावती व्यापाऱ्याने पाठवली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आणखी अडचणीत टाकले आहे.

शेतकऱ्याच्या हातात केवळ ९ रुपये ५० पैसे

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातल्या विविध भागातून शेतकरी चांगली किंमत मिळण्याच्या अपेक्षेने शेतमाल पाठवत असतात. पुण्यातील शिरूर येथील शेतकरी किसन फराटे यांनी आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून फ्लॉवर पीक घेतले होते. फराटे यांनी व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांच्याकडे ११ ऑगस्ट रोजी आपला आठशे किलोचा फ्लॉवर पाठवला. या सर्व मालाला एकूण २ हजार ६८४ रुपये इतकाच दर आला. यातून वाहतूक भाडे, हमाली आणि वजनखर्चापोटी २ हजार ६७५ रुपये वळते करून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात फक्त ९ रुपये ५० पैसे आले.

याबाबत बोलताना फराटे यांनी सांगितले की , एपीएमसी’ बाजारात मी ८५० किलो फ्लावर विक्रीसाठी आणला होता. त्यासाठी मला केवळ ९.५० रुपये मिळाले.माझे इतकेच म्हणणे आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा. नाहीतर नाहीतर तो शेती का करेल? दरम्यान, ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात फ्लॉवर कमीत कमी १६ ते जास्तीत जास्त ३० रुपये प्रतिकिलो दराने तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्याच्या हातात मात्र तीन ते चार रुपयेही मिळत नाहीत.

See also  2 नवंबर को राजभवन मार्च को सफल बनाने के लिए जनसंपर्क चलाएं।

Leave a Comment