Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी रोखण्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘एक राष्ट्र एक खत’ ही योजना अस्तित्वात आणली आहे. या योजनेअंतर्गत सर्व खत ही एकाच ब्रँडखाली विकली जाणार आहेत.

असे असताना आता रब्बी हंगामासाठी तुम्ही जर खते वापरणार असाल तर राज्यामध्ये 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणिक आढळले आहेत. आणि त्याच्यामुळे 19 खतांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही 19 खते कोणती आहेत ? ते का वापरू नयेत हे जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे.

राज्याच्या कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आहे. ही खत (Fertilizer) शेतकऱ्यांनी खरेदी करू नये असं आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने हे अप्रामाणीत आढळल्याने ही खाते विक्री करण्यावर संपूर्ण राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नयेत असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय.

खतांमधील इन्ग्रेडिट कमी झाल्याने ते अप्रमनित करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांचा खरेदी करू नये असं आवाहन देखील करण्यात आले आहे. या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे असून ही खत खरेदी करण्याचा टाळलं गेलं पाहिजे.

See also  कसे कराल लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

ही खते खरेदी करू नये

शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक, एस एस पी के पी आर, ऍग्रो केम, यासह विविध 19 खतांचे (Fertilizer) नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment