घरगुती व्यवसाय महिलांसाठी | घरगुती उद्योग

घरगुती व्यवसाय महिलांसाठी >> ( २०२१ मध्ये घरी असलेल्या महिलांसाठी व्यवसायाच्या कल्पना (घरातील स्त्रिया किंवा आई किंवा वडिलांसाठी सर्वोत्कृष्ट घरगुती व्यवसाय महिलांसाठी / व्यवसाय यादी मराठी / उद्योग व्यवसायांची यादी / घरी करता येणारे उद्योग व्यवसाय / घर बसल्या काम / घरबसल्या उद्योग / घरबसल्या व्यवसाय / घरगुती बिजनेस / ghar baslya vyavsay / mahilansathi ghar baslya kam / ghar baslya udyog in marathi / gharguti udyog )

अनेक व्यवसाय असे आहेत जे कोणतीही महिला तिच्या घरातून करू शकते आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. दररोजच्या कामामधून अगदी थोडा वेळ काढून आणि थोडे प्रयत्न केल्यास कोणतीही महिला अगदी सहजतेने हे व्यवसाय करू शकते. 

घरी बसून काम पाहिजे चला तर मग बघूयात घरी करता येणारे उद्योग / व्यवसाय.

Table of Contents

घरगुती व्यवसाय महिलांसाठी / स्त्रियांसाठी घरगुती व्यवसायांची नावे आणि माहिती (Homemade Business Ideas For Ladies / home business for ladies in marathi )

तुम्ही खालील पैकी कोणताही व्यवसाय करत असाल किंवा सुरू केला असेन, तर तुम्ही तो व्यवसाय वाढवण्यासाठी त्याची जाहिरात whatsapp वर आणि facebook वर देखील करू शकता. परंतु हल्ली प्रत्येक व्यक्ती काही घ्यायचे म्हंटले तरी आधी गूगल वर सर्च करतो.. जसे की “cake shop near me” “chinese near me” “beauty parlor near me” आणि बरेच काही. असे सर्च करणारे ग्राहक तुम्हाला मिळू शकतात, त्यासाठी तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर करायचा असेन तर खालील “local business online” या बटन वर क्लिक करा.

चला तर मग जाणून घेऊयात महिलांसाठी सर्वोत्तम घरगुती व्यवसाय कोणते कोणते आहेत .

इंटरनेट शी संबंधित घरगुती व्यवसाय कल्पना (Internet Related Home Based Business Ideas / online business ideas)

ऑनलाइन कपडे विक्री – उत्तम घरगुती व्यवसाय महिलांसाठी

शहरी भागात आजकाल बर्‍याच अशा महिला आढळून येतात की ज्या ऑनलाइन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत.तुम्ही देखील असेच ऑनलाइन सोशल मिडिया च्या माध्यमातून कपडे विक्री करू शकता.

काही विक्रेत्या वेबसाइट (Shop101,Meesho) तर अशा आहेत की ज्यांचा वापर करून तुम्ही काहीही गुंतवणूक न करता ऑनलाइन कपडे विक्री करू शकता.

त्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्या वेबसाइट किंवा ऐप वरील कपड्यांचे फोटो वापरुन सोशल मिडिया च्या माध्यमातून ते कपडे विकायचे आहेत.

कपड्यांच्या बरोबरीनेच तुम्ही दागिने,पर्स,बॅग,बूट,चप्पल ह्या वस्तु देखील ऑनलाइन विकू शकता.  

ऑनलाइन बुकिंगचा घरगुती व्यवसाय

आपल्याला जर कॉम्प्युटर हाताळता येत असेल व इंटरनेट ची माहिती असेल तर आपण घरबसल्या ऑनलाइन रेल्वे, बस किंवा विमान टिकिट बूकिंग चा व्यवसाय करू शकता.

याच्या जोडीला विविध प्रकारची बिले जसे देखील तुम्ही ऑनलाइन भरू शकता.

ह्या व्यवसायासाठी तुम्हाला एक कॉम्प्युटर,एक प्रिंटर,आणि इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता आहे.

ऑनलाइन बुकिंगचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये खर्च येऊ शकतो व या व्यवसायात नफा हा अस्थिर आहे.        

वेब डिझायनिंगउत्तम घरगुती व्यवसाय महिलांसाठी

एखादा कोर्स करून जर तुम्हाला घरबसल्या उत्तम काम पाहिजे असेल तर तुम्ही वेबसाइट डिजायनिंग चा कोर्स करू शकता.

See also  गरीब मजदुर का बेटा जिनका दरोगा और सचिव में सफलता

ज्या महिलांनी वेबसाइट डिझायनिंगचा कोर्स केला असेल, त्या वेबसाइट डिझाइन करण्याचे काम त्यांच्या घरातून करू शकतात.

विविध छोटे मोठे उद्योजक स्वतःच्या कंपनीची वेबसाइट बनवण्या साठी असे वेब डिजायनिंग करणार्‍या लोकांच्या शोधात असतात.

अशा छोट्या मोठ्या उद्योगांच्या वेबसाइट डिजाइन करण्यासाठी तुम्हाला घर बसल्या काम देणार्‍या काही वेबसाइट वर रजिस्टर करावे लागेल.

Freelancer.com ही त्यातलीच एक वेबसाइट आहे.अशा प्रकारच्या वेबसाइट वर रजिस्टर करून तुम्ही तुमचा बायोडाटा अपलोड करा आणि वेब डिजाइन चा कोर्स केला असल्याची माहिती त्यात लिहा.तुम्हाला वेब डिजायनिंग ची कामे मिळतील जी तुम्ही घरी बसून करू शकता.

वेब साइट चा व्यवसाय

आताच्या ह्या नेटवर्किंग च्या युगात कोणतीही महिला स्वतः ची नवीन वेबसाइट सुरू करू शकते.आणि त्या वेबसाइट वर जाहिरात दाखवून आणि इतर मार्गाने पैसे कमावू शकते.

अशा प्रकारे वेबसाइट द्वारे पैसे कमावण्या साठी आपल्याला फक्त एकच वेबसाइट बनवायची आहे. ती वेबसाइट कोणत्याही प्रकारची असू शकते न्यूज,करमणुकीची,स्वयंपाक पद्धती विषयी किंवा मग लेडीज च्या शॉपिंग विषयी. अश्या प्रकारची वेबसाइट बनवून तुम्ही त्यावर गूगल च्या जाहीराती दाखवून पैसे कमावू शकता.

शक्यतो आपण आपल्याला ज्या विषयाशी संबंधित थोडीफार माहिती आहे किंवा ज्या विषया वर तुम्ही ब्लॉग लिहू शकता अशा विषयावर तुम्ही वेबसाइट सुरू करावी.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला १० हजारांच्या जवळपास खर्च येऊ शकतो. आणि या व्यवसायातून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता. तुमचा नफा हा तुमच्या वेबसाइट वर किती लोक येतात त्याच्यावर अवलंबून असेल.  

YouTube

वेबसाइट प्रमाणेच तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता आणि व्हिडीयो च्या दरम्यान दिसणार्‍या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावू शकता.अशा प्रकारचे youtube चॅनेल सुरू करण्या पूर्वी तुम्हाला व्हिडीयो एडिटिंग आणि कॅमेरा समोर बोलणे या दोन गोष्टी थोड्या बहुत प्रमाणात यायला हवा.  

You tube एक घरगुती व्यवसाय

Youtube चॅनेल वर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील व्हिडीयो तयार करून अपलोड करू शकता.जर तुम्हाला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर तुम्ही स्वयंपाकच्या रेसपी चे व्हिडीयो बनवून अपलोड करा.

या आणि अशा बर्‍याच व्हिडीयोजला यूट्यूब वर चांगला प्रतिसाद मिळतो.या व्यवसाया मध्ये तुम्हाला सुरवातीच्या काळात चांगला चांगला कॅमेरा वगैरे घेऊन जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही,तुम्ही तुमच्या मोबाइल वरुन व्हिडीयो बनवून देखील अपलोड करू शकता आणि पैसे कमावू शकता.   

लेखक

बर्‍याच अशा वेबसाइट आहेत ज्यांना उत्कृष्ट लेखकांची गरज आहे. जर तुम्हाला लेख कसा लिहायचा हे माहीत असेल तर तुम्ही अशा वेबसाइट सोबत कंटेंट रॉयटर चे काम करू शकता.

त्यासाठी तुम्हाला तुमचा बायोडाटा ऑनलाइन फ्री-लानसिंग करणार्‍या वेबसाइट वर अपलोड करावा लागेल जिथे तुम्हाला अशा वेबसाइट संपर्क करतील ज्यांना लेखकांची गरज आहे.

या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही,आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण घरबसल्या चांगले पैसे कमावू शकता.     

स्त्रियांसाठी शिक्षण क्षेत्रातील घरगुती व्यवसाय कल्पना / (gharguti kam / gruh udyog in marathi) (Education Sector Related Home Based Business Ideas)

शिकवणी

जर आपले चांगले शिक्षण झाले असेल आणि अभ्यासाची आवड असेल तर आपण आपल्या घरातून जवळपास च्या मुलांना शिकवणी (ट्यूशन) देण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

शिकवण्याचे हे काम करण्यासाठी, आपल्या दैनंदिन जीवनातून एक ते दोन तासांचा कालावधी ध्यावा लागेल.

आपण आता कोरोना विषानूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन क्लास देखील घेऊ शकता आणि ते देखील कोणत्याही विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवू शकता. बर्‍याच वेबसाइट या तुम्हाला ऑनलाइन विद्यार्थी मिळवून देतात. उदा. urbanpro.com

शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी किमान 5 हजार रुपये खर्च येतो व या व्यवसायात नफा अस्थिर आहे.

कोचिंग क्लास – उत्तम घरगुती व्यवसाय

सुरवातीच्या काळात तुम्ही कमी विद्यार्थ्यांसह आपला शिकवणी वर्ग घरातून सुरू करू शकता आणि काही कालावधी नंतर आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली की आपण मोठ्या प्रमाणात कोचिंग सेंटर देखील उघडू शकता.

संगीत शिकवणी

ज्या महिलांना संगीताचे ज्ञान आहे, ते आपल्या घरातून इतर महिलांना किंवा मुलांना संगीत प्रशिक्षण देणे देखील सुरू करू शकतात.

या व्यतिरिक्त चित्रकला क्षेत्रातील चांगले ज्ञान असेल तर तुम्ही मुलांना ड्रॉईंग शिकवण्याचे वर्गदेखील घेऊ शकता.

किंवा जर एखाद्या स्रीला एखाद्या प्रकारच्या कले मध्ये निपुणता असेल आणि त्यात चांगले ज्ञान असेल तर ती या ज्ञानाद्वारे पैसे कमवू शकते.

संगीत वर्ग सुरू करण्यासाठी फक्त कलेशी संबंधित वस्तु किंवा Instruments घेण्यासाठी खर्च येतो.या व्यवसायात नफा अस्थिर आहे

महिलांसाठी सेवा क्षेत्रातील घरगुती व्यवसाय कल्पना (Service Sector Home Based Business Ideas)

अकाऊंट कीपिंग – घरगुती व्यवसाय महिलांसाठी फायदेशीर

जर आपण वाणिज्य शाखेतून पदवीधर असाल तर आपण आपल्या घरातून अकाउंट कीपिंग चा व्यवसाय सुरू करू शकता. कारण बर्‍याच लहान कंपन्या अशा लोकांना शोधत असतात जे त्यांच्या कंपनीच्या खात्याशी संबंधित काम करू शकतील जसे की त्यांच्यासाठी बॅलेन्स शीट तयार करणे.

See also  5 महत्वपूर्ण तरीके पिता बाल विकास को प्रभावित करते हैं

अशा प्रकारचे घरबसल्या काम मिळविण्यासाठी आपल्याला नोकरी संबंधित वेब साइटवर आपला बायोडाटा अपलोड करावा लागेल.

हा व्यवसाय सुरू करण्याची किंमत जास्त नाही आणि या व्यवसाया मध्ये अस्थिर नफा आहे.

विवाह जमवणारे कार्यालय

घरबसल्या आपण आपले विवाह जमवणारे कार्यालय चा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात जास्त गुंतवणूकीची आवश्यकता नाहीये. फक्त तुमच्या कडे लग्नासाठी जोडीदार शोधत असलेल्या काही चांगल्या उमेदवारांची माहिती असावी आणि आपण त्यांच्या जोडीदाराची ओळख करुन देऊन कमिशन म्हणून चांगले पैसे मिळवू शकता.

हा बिजनेस सुरू करण्यासाठी आपल्याला आपला वेळ सोडला तर फार कोणत्या गोष्टीची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. ह्या व्यवसायात नफा हा अस्थिर आहे.

कार्यक्रम नियोजक (इव्हेंट प्लॅनिंग)

आपल्याला इव्हेंट प्लॅनिंग करणे आवडत असल्यास आपण घरातून तुम्ही तुमचा इव्हेंट प्लॅनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता आणि एक उत्कृष्ट इव्हेंट प्लॅनर बनू शकता.

इव्हेंट प्लॅनर बनून आपण लोकांसाठी नवीन वर्ष, वाढदिवस, वर्धापनदिन, कोणत्याही सण-उत्सव किंवा पार्टीसाठी योजना आखू शकता आणि त्याबदल्यात चांगले पैसे कमवू शकता.

ब्लॉग लिहणे – उत्तम घरगुती व्यवसाय

ब्लॉगिंग हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकता, परंतु हा व्यवसाय सुरू करण्या पूर्वी आपल्याला ब्लॉग कसे लिहले जातात हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि लोकांना कोणत्या प्रकारचे विषय वाचण्यात रस आहे याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

अशा अनेक वेब साईट आहेत जिथे तुम्ही फ्री मध्ये तुमचे विचार लिहू शकता आणि पैसे मिळवू शकता.या खेरीस तुम्ही स्वतः ची ब्लॉगिंग वेबसाइट बनवू शकता. आणि तुमच्या तसेच लोकांच्या आवडीची माहिती लिहू शकता आणि त्या साइट वर जाहिरात करून आपण पैसे मिळवू शकता.

ब्लॉगिंग चा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 10000 रुपये खर्च येऊ शकतो आणि या व्यवसाया मध्ये नफा अस्थिर असतो.

लहान मुल सांभाळण्याचा घरगुती व्यवसाय

आजकाल शहरी भागातील बहुतेक स्त्रिया नोकरी करीत आहेत ज्यांना आपल्या मुलांसाठी त्या कामावर गेलेल्या असताना बाळ सांभाळणार्‍या व्यक्तीची आवश्यकता असते.

जर आपण इच्छुक असाल तर आपल्या घरातून लहान बाळ सांभाळण्याचा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता आणि ज्या मुलांची आई काम करीत आहे अशा मुलांची काळजी घेऊ शकता.

परंतु लक्षात असूद्या या कामासाठी तुम्हाला दररोज किमान 9 तास वेळ द्यावा लागेल. तसेच, तुम्हाल्या तुमच्या घरात जागा तयार करावी लागेल जिथे आपण ह्या लहान मुलांना खेळण्यासाठी सोयी – सुविधा देऊ शकता.

बाळ सांभाळण्याचा हा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च फार कमी येतो. तसेच या व्यवसायात नफा हा स्थिर नसेल.

घरातून विविध वस्तूंची विक्री

आपण होलसेल मार्केट मधून माल घेऊन तो आपल्या सोसायटी मध्ये किंवा आपल्या जवळ पास च्या महिलांना रीटेलर च्या भावात विकू शकता.

फक्त महिलांच्या उपयोगी जसे की लेडीज बॅग,पर्स,शो च्या वस्तु,शो चे दागिने या वस्तु जरी आपण विकल्या तरी चांगला नफा मिळवू शकता.

शहरी भागात विविध उत्पादनांची विक्रीसाठी १ ते २ दिवसांचे फेस्टिवल असतात तुम्ही त्या मध्ये असे प्रोडक्ट घेऊन तुमचं स्टॉल लावला तरी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. या व्यवसाया मध्ये सोशल मिडिया चा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्याला चांगले यश मिळू शकते.

अशा वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 25 हजार रुपये खर्च येतो जो की या वस्तु होलसेल भावाने विकत घेण्यासाठीच असून या धंद्यात नफा हा अस्थिर असतो.

ब्युटी पार्लरचा व्यवसाय

ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणे हा महिलांसाठी चांगला पर्याय असू शकतो. कोणतीही स्री आपल्या घरातून हा व्यवसाय चालवू शकते.हा व्यवसाय सुरू करण्या आधी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण हा व्यवसाय आपल्या घरा जवळ एखादे दुकान भाड्याने घेऊन किंवा तुमच्या घरातून सुरू करू शकता.तसेच आपण वाढदिवस,लग्न समारंभ अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ऑर्डर घेऊ शकता ज्यातून तुम्हाला चांगला नफा होईल.

ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी किमान 25000 खर्च अपेक्षित आहे, ह्या धंद्यात नफा हा अस्थिर असतो.

स्रीयांसाठी खाद्य पदार्थ आधारित घरगुती व्यवसाय (Food Sector Related Home Based Business Ideas)

मिठाई व्यवसाय

अशा अनेक गृहिणी महिला आहेत ज्या आपल्या घरातून मिठाई बनवून विकतात. म्हणूनच, जर आपणास स्वादिष्ट मिठाई कशी बनवायची हे माहित असेल तर आपण लोकांच्या कार्यक्रमात अशा प्रकारची मिठाई बनवून विकण्याचे काम करू शकता.

मिठाईंचा व्यवसाय घरातून सुरू करण्यासाठी किमान 5 हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायात नफा अस्थिर आहे.

घरगुती खानावळ

जर आपल्याला चांगले अन्न कसे बनवायचे हे माहित असेल तर आपण घरगुती डबा विक्रीचा व्यवसाय देखील करू शकता.

See also  Solutions to save money Some Tricks to Survive Money

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्या हाताला चव असणे गरजेचे आहे.

आपण घरातून बनवलेले जेवण अभ्यासासाठी आणि नोकरी करण्यासाठी शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्यांना मंथली मेस च्या माध्यमातून विकू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च काही जास्त नाही. आणि या व्यवसायात नफा अस्थिर आहे.

स्वयंपाकाची शिकवणी – चांगला घरगुती व्यवसाय

विशेषतः शहरी भागातील महिला आपल्या घरातून लोकांना स्वयंपाक शिकवण्याचे काम देखील सुरू करू शकतात आणि आठवड्यातून फक्त दोन दिवस स्वयंपाक वर्ग घेऊन पैसे कमवू शकतात.

अशा प्रकारचा  व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला एक स्वयंपाकघर आणि काही भांडी आवश्यक असतील.

एक स्वयंपाक वर्ग सुरू करण्यासाठी किमान 20 हजार ते 25 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो आणि या व्यवसायामध्ये नफा किमान 30 टक्के आहे.

घरगुती लोणचे, पापड, शेवया आणि तूप उत्पादन व्यवसाय

या दोन गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येक हंगामात खरेदी केल्या जातात. घरी बनवलेले लोणचे आणि घरी कढवलेले तूप हे बरेच लोक पसंत करतात आणि विकत देखील घेतात.तसेच हल्ली बर्‍याच महिला पापड व शेवया यांसारखे पदार्थ देखील विकत घेणेच पसंद करतात.

म्हणून जर घरागुती लोणचे, पापड, शेवया आणि तूप यांपैकी काहीही कसे तयार करायचे हे तुम्हाला माहित असेल तर आपण ते बनवून विकण्यास प्रारंभ करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता.

घरगुती लोणचे आणि तूप विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 3 हजार ते 5 हजारांचा खर्च येऊ शकतो.तर पापड व शेवया बनवण्याचा व्यवसाय तुम्ही यांपेक्षा कमी खर्चात सुरू करू शकता. यांसारख्या व्यवसायातून तुम्ही साधारण 30 टक्के नफा मिळवू शकता.

घरगुती केक बनविणे – ट्रेंडिंग घरगुती व्यवसाय

केक बनवणे हा महिलांमध्ये सध्या लोकप्रिय व्यवसाय आहे. शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागातील देखील बर्‍याच अशा गृहिणी आहेत ज्या घरी केक बनवून तो विकतात. म्हणूनच, केक कसा बनवायचा हे आपल्याला माहित असल्यास आपण देखील केक विक्रीचा व्यवसाय घरातून सुरू करू शकता.

सुरुवातीला आपण आपल्या परिसरातील लोकांकडून केक ची ऑर्डर घेऊ शकता, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या ऑर्डर मिळवू शकता. आणि हळू हळू आपल्या आसपास च्या केक शॉपमध्ये केकची विक्री सुरू करू शकता.

केक बनवण्याचा धंदा सुरू करण्यासाठी किमान 5 हजार ते 10 हजारांचा खर्च येतो आणि या व्यावसाया मधील नफा हा साधारण 20% ते 30% पर्यंत आहे.

सर्जनशीलतेवर आधारित घरगुती व्यवसाय (Creativity Related Business Ideas)

मेहंदी

मेहंदी

ज्या महिलांना मेहंदी काढता येते त्या महिला आपल्या घरातून मेहंदी काढण्याचा व्यवसाय करू शकतात.सणासुदीला अशा मेहंदी काढणार्‍या महिलांना जास्त मागणी असते. सुरवातीच्या काळात आपण मेहंदी काढून देण्याचा व्यवसाय करून अनुभव घेतल्या नंतर आपण मेहंदीचे क्लास देखील घेऊ शकता अशा प्रकारचे क्लास करणार्‍या बर्‍याच मुली आपल्याला आपल्या जवळ पास च्या भागात मिळतील.    

हा मेहंदी व्यवसाय सुरू करण्यासाठी काही खर्च येत नाही व या व्यवसायात नफा हा अस्थिर असेल.

दागिन्यांचा घरगुती व्यवसाय

हाताने बनविलेल्या दागिन्यांना चांगली मागणी आहे.तुम्ही तुमच्या घरातून दागिने बनवून विकू शकता.आपल्याला दागिने कसे बनवायचे हे माहीत नसल्यास आपण त्याचे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही.बनवलेले दागिन्यांची आपण ऑनलाइन amazon, flipkart सारख्या वेबसाइट वर विक्री करू शकता.

हाताने दागिने बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 30 हजार रुपये खर्च येतो,या व्यवसायात साधारण ४०% नफा मिळतो.

शिवणकाम व्यवसाय

शिवणकाम व्यवसाय

आपल्याला शिलाई मशीन वर काम कसे करायचे हे माहित असल्यास आपण टेलरिंग चा व्यवसाय सुरू करून लोकांचे कपडे शिवून देऊ शकता. लोकांचे कपडे शिवण्या बरोबरच आपण आपल्या जवळपास च्या मुलींसाठी शिवणकाम संबंधित क्लास देखील घेऊ शकता आणि पैसे कमवू शकता.

अशा प्रकारचा टेलरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शिलाई मशीन विकत घेण्याखेरीस इतर कोणता खर्च नसून या व्यवसाया मधून होणारा नफा हा अस्थिर असतो.

मेणबत्ती बनवण्याचा घरगुती व्यवसाय

सजावटीसाठी तसेच धार्मिक ठिकाणी मेणबत्ती वापरली जाते. तुम्ही तुमच्या घरातून हा मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. प्रथम तुम्हाला मेणापासून मेणबत्ती बनवण्याचे तंत्र शिकणे गरजेचे आहे.

मेणबत्ती बनवण्याचा घरगुती व्यवसाय

तुम्ही मेणबत्ती कशी बनवायची हे शिकल्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या बनवून जवळ च्या दुकाना मध्ये तसेच ऑनलाइन त्यांची विक्री तुम्ही करू शकता.  

घरगुती मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी साधारण १० ते १५ हजार रुपये खर्च येतो व या व्यवसाया मध्ये १५ ते ३० टक्के नफा होऊ शकतो.

सारांश – घरगुती व्यवसाय महिलांसाठी / घरगुती व्यवसाय यादी / gharguti vyavsay

कोणताही व्यवसाय किंवा धंदा हा लहान किंवा मोठा नसतो. प्रत्येक व्यवसाय करण्याचा मुख्य हेतु एकच असतो आणि तो म्हणजे नफा मिळवणे. त्यामुळे तुम्ही मनात कसला ही न्यूनगंड न बाळगता, कोणताही व्यवसाय जिद्द आणि चिकाटीने केल्यास यश नक्की मिळते. वरील व्यवसायां पैकी किंवा त्या व्यतिरिक्त इतर कोणता ही व्यवसाय तुम्ही काळजीपूर्वक आणि कष्टाने सुरू केल्यास कमी वेळातच तुम्ही घर बसल्या चांगले पैसे कमावू शकता.  

बिनभांडवली व्यवसाय कोणते आहेत ?

वरील लेखामध्ये दिलेल्या व्यवसायांच्या यादी पैकी अनेक व्यवसाय हे बिनभांडवली व्यवसाय आहेत जसे की, वेबसाइट चा व्यवसाय,यूट्यूब,विविध प्रकारच्या शिकवणी (संगीत शिकवणी,स्वयंपाक शिकवणी,कोचिंग क्लास,मेहंदी क्लास ), अकाऊंट कीपिंग इत्यादी.

कमी पैशात कोणता व्यवसाय करावा ?

काही असे व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी कमी पैशात करू शकता. पुढे काही व्यवसाय असे देत आहोत जे करण्यासाठी तुम्हाला जास्तीतजास्त १०,००० रुपये खर्च येतो :- ब्लॉग लिहणे, शिवणकाम व्यवसाय, घरगुती केक बनवणे, वेबसाइट डेवलपमेंट, दागिन्यांचा व्यवसाय, घरगुती शेवया,लोणचे,पापड,तूप बनवणे इ.

बिझनेस आयडिया मराठी ?

काही बिझनेस आयडिया मराठी प्रमाणे :-
बिनभांडवली बिझनेस
वेबसाइट चा व्यवसाय,यूट्यूब,विविध प्रकारच्या शिकवणी (संगीत शिकवणी,स्वयंपाक शिकवणी,कोचिंग क्लास,मेहंदी क्लास ), अकाऊंट कीपिंग इ.
कमी पैशात करता येणारे बिझनेस (कमाल अपेक्षित खर्च १०,००० रुपये)
ब्लॉग लिहणे, शिवणकाम व्यवसाय, घरगुती केक बनवणे, वेबसाइट डेवलपमेंट, दागिन्यांचा व्यवसाय, घरगुती शेवया,लोणचे,पापड,तूप बनवणे इ.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Leave a Comment