संत्रापट्टयात पुन्हा फळगळीचा फटका | Hello Krushi

हॅलो कृषी ऑनलाईन : संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रापट्टयात पुन्हा फळगळीने थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांची शिफारस संशोधन संस्थांकडून होत नसल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान बघण्याशिवाय कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांसमोर उरला नसल्याचेही वास्तव आहे.

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

जूनपर्यंत तापमान कायम ४० ते ४३ अंशापर्यंत होते. तापमानातील वाढीचा फटका बसत हंगामाच्या सुरुवातीलाच लहान फळांची गळ झाली. एकूण पाच लाख टन उत्पादनांपैकी सुमारे दोन लाख टन लहान आकाराची फळे गळून पडली, असा दावा ‘महाऑरेंज’ने केला होता. यामुळे सरासरी ५०० कोटींचे नुकसान झाले. यातून कसेबसे सावरत बागेतील शिल्लक फळांच्या व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र जुलै महिन्यात पावसाची संततधार झाली. तर काही भागात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. तब्बल २१ दिवस सूर्याचे दर्शनच झाले नाही. परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे पुन्हा फळगळ होऊन सुमारे १ लाख २५ हजार टन फळांची गळ झाल्याचा अंदाज ‘महाऑरेंज’चे तांत्रिक सल्लागार सुधीर जगताप यांनी व्यक्‍त केला आहे.

आंबिया बहराचे व्यवस्थापन

डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडून डिसेंबर अखेरीस पाणी दिले जाते. परंतु हा बहार पाण्याऐवजी थंडीमुळे जास्त फुटतो. डिसेंबर-जानेवारीत फूलधारणा होते. या हंगामातील फळे नोव्हेंबर महिन्यात तोडणीसाठी येतात.

कोलेटोट्रिकम, डिप्लोडिया, बॉट्रायटीस, अल्टरनेरिया या चार प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव फळगळीला कारणीभूत ठरतो. फळमाशीचाही (फ्रूटफ्लाय) काही भागात फटका बसला असल्याचे सुधीर जगताप यांनी सांगितले.

See also  ये है देश की सबसे सस्ती 6-एयरबैग वाली Car, कीमत बिल्कुल आपके बजट में.. जानें –

Leave a Comment